खेर्डा प्रकल्पाला जूनपर्यंत पाणी सुरू ठेवा

Foto
दोन्ही मोटारी पूर्ण क्षमतेने चालवा : किशोर तांगडे यांची मागणी

पैठण, (प्रतिनिधी) : खेर्डा प्रकल्पातील पाणीसाठा, परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची गरज आणि सहा ते सात गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतून खेर्डा प्रकल्पाकडे सोडण्यात येणारे पाणी जून महिन्यापर्यंत एकही दिवस बंद करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर अशोकराव तांगडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाटबंधारे विभागाचे योगेश परदेशी यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष खेर्डा प्रकल्प परिसराची पाहणी केली.

सध्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दोन मोटारींद्वारे खेर्डा प्रकल्पाकडे सुमारे ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. या दोन्ही मोटारी केवळ ६० टक्के क्षमतेने  टप्पा क्रमांक दोनमधील केवळ दीड किलोमीटर अंतराचे कालव्याचे काम अपूर्ण असल्यामुळे उर्वरित काम पूर्ण होऊनही रहाटगाव, सोनलापूर परिसरात पाणी पोहोचत नाही. यामुळे वरुडी, रहाटगाव आणि सोनलापूर परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. संबंधित भूसंपादन प्रक्रिया आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली.

-- शेतकरी पाण्यापासून वंचित -- 
सुरू असल्याने त्या १०० टक्के क्षमतेने चालवून जास्तीत जास्त पाणी खेर्डा प्रकल्पात सोडावे, अशी मागणी तांगडे यांनी केली. खेर्डा प्रकल्प परिसरात सहा ते सात गावांच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उपलब्ध आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी या प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे पाणी नेलेले आहे. त्यामुळे अधिक क्षमतेने पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या सिंचनासह गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार आहे.

-- खेर्डा प्रकल्पाला केवळ ९० क्युसेक्स -- 
सध्या योजनेच्या डाव्या कालव्याद्वारे २२०० क्युसेक्स, तर उजव्या कालव्याद्वारे ११०० क्युसेक्स, असे एकूण ३३०० क्युसेक्स पाणी सुरू आहे. दुसरीकडे खेर्डा प्रकल्पाकडे केवळ ९० क्युसेक्स पाणी येत आहे. म्हणजेच दोन्ही कालव्यांना एका दिवसात जाणाऱ्या पाण्याइतके पाणी खेर्डा प्रकल्पात जमा होण्यासाठी सुमारे एक महिना लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना खेर्डा प्रकल्पाच्या गरजेकडे दुर्लक्ष करू नये, असे तांगडे यांनी स्पष्ट केल

-- शेतकऱ्यांवर वसुलीची सक्ती नको -- 
या उपसा सिंचन योजनेचा वार्षिक वीज खर्च सुमारे एक कोटी रुपये आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता महावितरणचे वीज बिल शेतकऱ्यांकडून वसूल न करता संबंधित विभागाने शासनाच्या माध्यमातून भरावे. शेतकऱ्यांवर वसुलीसाठी कोणतीही सक्ती करू नये, अशी मागणी तांगडे यांनी केली. खेर्डा प्रकल्पात येणारे पाणी हे परिसरातील शेतकरी आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

त्यामुळे आजपासून जून महिन्यापर्यंत एकही दिवस पाणी बंद करण्यात येऊ नये. हे आमच्या हक्काचे पाणी असून दोन्ही मोटारी पूर्ण १०० टक्के क्षमतेने चालवून पाणी सोडण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका किशोर अशोक तांगडे यांनी मांडली.